Ahmednagar News : भंडारदरा नंतर जिल्ह्यातील ‘हे’ धरणसुद्धा भरले !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- उत्तर नगर जिल्ह्याला वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण रविवारी काठोकाठ भरून वाहु लागले, त्या पाठोपाठ प्रवरा नदीवरील निळवंडे धरणही आज सोमवारी भरले आहे.

पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणातून 10856 क्यूसेक पाणी प्रवरा नदी पात्रात सोडले आहे. त्यामुळे प्रवरा नदी प्रथमच दुथडी भरून वाहू लागली आहे. मुळा , भंडारदरा, निळवंडे पाणलोट क्षेत्रास काल अक्षरशः झोडपुन काढले. रात्रीतून कदाचित प्रवरेच्या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील पाच दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्याने रविवारी सकाळी अकरा वाजता भंडारदरा धरण काठोकाठ भरले आणि या धरणातून ४ हजार ४०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

या पाण्याबरोबरच कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कृष्णावंतीचे पाणी आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी असे सर्व पाणी निळवंडे धरणात येत आहे. या पाण्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली.

सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या धरणातील पाणी साठा ९४ टक्के झाला. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

प्रवरा पात्रात ३ हजार ३६० क्युसेकने पाणी पडू लागले. सोमवारी सकाळी या हंगामातील सुरवातीलाच येथील वीजनिर्मिती सुरू झाली. वीज निर्मितीसाठी धरणातून ६८५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते.

मागील पाच दिवसांपासून भंडारदरा व निळवंडे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भंडारदरा धरण ओव्हरफलो झाले.

त्यामुळे भंडारदरा धरणातुन 4 हजार 400 क्यूसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हा विसर्ग वाढत जात तो सोमवारी सकाळी 7 हजार 500 क्यूसेक पर्यन्त वाढविण्यात आला.तर सायंकाळी 6 वाजता 7 हजार 744 विसर्ग करण्यात आला.

Ahmednagarlive24 Office