file photo

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना राहुरी पोलिसांनी मुसक्या आवळून ताब्यात घेतले. मात्र या चंदन तस्करीमध्ये आणखी दोघांची नावे समोर आली असून एक राष्ट्रवादी पक्षाचा सरपंच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दि. ६ सप्टेंबरला सायंकाळी चंदनचोर अमर पवार व विजय पवार हे वांबोरी परिसरात प्रसाद साखर कारखान्यापासून कात्रडकडे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सहा किलो वजनाची चंदनाचे लाकडे आढळली. पोलिसांनी एकूण १ लाख ८ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान या चंदन तस्करीमध्ये बाबासाहेब दशरथ शिंदे राहणार काञड ता. राहुरी.

तसेच राहुरी खुर्द येथील मल्हारी नामक तरूण या दोघांचा समावेश असल्याची कबुली पकडलेल्या आरोपींनी दिली. बाबासाहेब दशरथ शिंदे हा कात्रड ग्रामपंचायतचा विद्यमान सरपंच आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.