अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पारपडली. ही सभा ऑनलाईन पध्दतीने साडे सात तासांहून अधिक काळ चालली.
सभेत संचालक मंडळाने बँकेच्या सर्व प्रकारच्या व्याजदारात पाव टक्का कपात करण्याचा निर्णय घेतला असून यावेळी बँकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत गैरप्रकार सिध्द झाल्यास सर्व पदाचा राजीनामा देण्याचे आव्हानच विरोधकांना दिले.
दरम्यान ऑनलाईन सभेला झुमवर 1 हजार 293 तर यु टूवर 3 हजार 778 सभासदांनी हजेरी लावत कामकाजात सहभाग घेतला.जिल्हा शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा रविवारी ऑनलाईन पध्दतीने पार पडली. अध्यक्षस्थानी पठाण होते. दरवर्षी प्रमाणे शिक्षकांच्या सभे गोंधळ होवू नयेत,
यासाठी संचालकपर्यंत कोणालाच येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली होती. यासह सभेत नेत्यांपासून सामान्य सभासदांना प्रत्येकी पाच मिनीट बोलण्याची संधी देण्यात आली.
सभेत मयत पडलेल्या सभासदांचे कर्ज माफ करण्यासोबत त्यांची देणे देण्यासाठी मयत सभासद कर्ज निवारण निधीसाठी दुसरीकडील पैसे तात्पुर्ते वर्ग करून संबंधीतांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. कुटुंब आधार योजनेत मृत सभासदांच्या कुटूंबांना 10 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून
यासाठी सभासदांकडून 150 ऐवजी 500 कपात घेण्यात येणार असून ठरावी काळानंतर ती कमी करण्यात येणार आहे. यासह सभासदांना सभा संपल्यानंतर सात टक्के लाभांश त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.आरबीआयच्या सुचनेनूसार बँकेची कोअर बँक प्रणाली सुधारण्यात येणार असून
काही ठिकाणी पदोन्नतीने शाखाधिकारी भरण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष पठाण यांनी दिली. तत्पूर्वी प्रस्ताविक संचालक साहेबराव अनाम यांनी केले. संचालक सुयोग पवार यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब खरात, राजु राहणे, उषा बनकर, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, संतोष दुसुंगे, नानासाहेब बडाख,
बाळासाहेब मुखेकर, सिमा क्षिरसागर, विद्यलता आढाव, दिलीप औताडे, किसन खेमनर, राजु मुंगसे, अविनाश निंभोरे, संतोष अकोलकर, अनिल भवर, गंगाराम गोडे, मंजुषा नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, बोर्ड सेक्रेटरी गणेश पाटील यांनी सभेच्या कामकाजात सहभाग घेतला.