अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकत या आजाराची लागण होऊन तीन कालवडी दगावल्याने राहुरी खुर्द परिसरातील गोपालक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राहुरी खुर्द व गोटुंबा आखाडा भागात या आजाराने धुमाकुळ घातला आहे. या भागातील बहुतांशी दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकत आजाराची लागण झाली आहे.
या आजाराने जनावरांच्या तोंडाच्या जबड्याला, पायाला जखमा होऊन चारा खाणे बंद झाले आहे. जनावरांच्या शरीरात तापाचे प्रमाण वाढत असल्याची माहिती गोपालक युवराज तोडमल यांनी दिली.
दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकत आजाराची लागण झालेली असताना माञ राहुरीतील पशु वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष झाले आहे.
पशु वैद्यकीय प्रशासनाकडुन या जनावरांची तातडीने तपासणी व उपचाराची गरज निर्माण झाली आहे.