Ahmednagar News : ‘त्या’ तरुणाच्या घरात आढळला मुलीचा मृतदेह,नातेवाईक म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- राहाता तालुक्यातिल चितळी येथे एका तरुणाच्या घरात अल्पवयीन आदिवासी मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे.

ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या घरात मृतदेह सापडल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ​सदर मुलीचा मृत्यू कशामुळे झाला? याविषयी माहिती मिळू शकली नाही. चितळी येथे आकाश खरात हा आपल्या आजीसोबत त्याच्या घरी रहात होता.

त्याचे कुटुंबिय कामानिमित्त औरंगाबाद येथे रहात असून, त्याची आजीही काही दिवसांपूर्वी औरंगाबादला गेली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आकाश घरी एकटाच रहात होता. मुलीचा मृतदेह आढळुन आला तेव्हा आकाश घरात नव्हता. ​गावातील ग्रामस्थांनी घरात मृतदेह असल्याचे पोलीसांना दिली.

त्यानुसार तालुका पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी (ता. १९) सायंकाळी चितळी येथील आकाश राधू खरात (वय २५) नावाच्या तरुणाच्या घरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याची माहिती येथील तालुका पोलीसांना मिळाली.

त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा घातपात झाला असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्याने तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालयाऐवजी नगर सिव्हील रुग्णालयात करण्यात आले.

शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेचा उलगडा होईल. तिच्यावर अत्याचार करुन तिचा घातपात करणार्‍यांविरुध्द कारवाई करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24