अहमदनगर-परळी रेल्वे सुरु होण्यासाठी आणखी ‘इतके’ वर्ष प्रतिक्षा, किती व कुठपर्यंत झालं काम? पहा एक रिपोर्ट

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : दळणवळणाची साधने विकासात मोठी भूमिका बजावत असतात. रेल्वेला जनसामान्यांची लाईफलाईन म्हटले गेले आहे. विविध कारणांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर-मराठवाडा यांना जोडण्यासाठी नगर-परळी रेल्वेलाइनची प्रतीक्षा आता नागरिकांना लागलेली आहे.

नगर-बीड-परळी या २६२ किमी अंतराच्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरु आहे. नगर-आष्टी रेल्वे सेवा सुरु झाली आहे. नगर ते आष्टी या ६४ किमी अंतराचे काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले.

नगर ते अंमळनेर हा शंभर किमीचा टप्पा पूर्ण झाला आहे. परंतु नगर-परळी मार्ग सुरू होण्यास आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागू शकते.

नगर-परळीसाठी किती प्रतीक्षा?
नगर-परळी रेल्वेमार्ग २६२ किमी अंतराचा आहे. यापैकी नगर ते अंमळनेर या १०० किमी अंतराचे काम पूर्ण झाले आहे. अंमळनेर ते एगनवाडी या ३३ किमी अंतराचा टप्पा आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. नगर ते वडवणी हा २०० किमी लांबीचा टप्पा २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

वडवणी ते परळी या ६१ किमीच्या कामासाठी २०२६ पर्यंत कालावधी लागणार आहे. यामुळे नगर-परळी मार्गासाठी आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ही कामे झालीयेत पूर्ण
– नगर ते नारायण डोहो (२०१७) – १२ किमी
– नारायण डोहो ते सोलापूरवाडी (२०१९) – २३ किमी
– सोलापूरवाडी ते आष्टी (२०२१) – ३० किमी
– आष्टी ते अंमळनेर (२०२४) – ३४ किमी

Ahmednagarlive24 Office