अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या पाथर्डी-नशिक या बसमध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच उघड झाले आहे.

सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हे एसटी चालक होते.त्यांच्या डोक्यावर कर्ज वाढल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. पोलिसांनी गाडीमधून मृतदेह बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असुन पुढील तपास सुरु केला आहे.

दरम्यान त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात म्हटले आहे की, मी मेल्यानंतर मला शासनाकडून जी काही रक्कम मिळेल. ती माझ्या घरच्यांकडे द्या. मी ज्यांचे-ज्यांचे पैसे घेतले आहेत. ते त्यांचे पैसे देऊन टाकतील. अशा या सुसाईड नोटने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नाशिक सुभाष तेलोरे हे मुळ पाथर्डी तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्यांचे एक बंधू नगर येथील बस डेपोत अधिकारी पदावर आहेत. तर घरी चांगली शेती असून दोन मुले, पत्नी आणि आई असा परिवार आहे. काल रविवार दि. 20 रोजी ते नियमित प्रमाणे कामावर हजर झाले होते. पाथर्डी ते नाशिक असा त्यांचा प्रवास असल्याने त्यांनी काल एम.एच.14 बी. टी 4887 ही गाडी आपल्या ताब्यात घेतली आणि ते मार्गस्त झाले.

डोक्यात इतका तणाव असून देखील आपल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात जायला नको. त्यामुळे, त्यांनी दिवसभर सावध रितीने गाडी चालविली. आपल्या वैयक्तीक आयुष्याचा स्ट्रेस त्यांनी कोठेही आपल्या कामात दाखविला नाही. त्यामुळे, तेलोरे यांच्या सोबत असणार्‍या वाहकाच्या देखील लक्षात आले नाही की, चालक प्रचंड तणावात आहे.

तेलोरे यांनी पाथर्डी तालुक्यातील आणि अन्य मित्रांकडून सहा लाख रुपये हातऊसणे पैसे घेतले होते. त्यांना वायदे करुन करुन आता ते देखील दमले होते. मात्र त्यांच्याकडून वारंवार होणारे त्रास आणि स्वत: पैसे घेऊन देखील ते आपण देऊ शकत नाही. याची खंत त्यांना होती. घरी बंगला, गाडी, शेतीला आणि आजार वैगरे या कारणास्तव कर्ज झाल्याचे बोलले जाते. मात्र, ते घेणे वेळेवर देणे झाले नाही.

त्यामुळे, तेलोरे हे प्रचंड तणावाखाली होते. दरम्यान, रात्री त्यांची बस संगमनेर स्थानकावर येऊन थांबली होती. त्यांनी काही काळ तेथे आराम केले. त्याच्या सोबत असणारा व्यक्ती देखील गाडीत मागच्या सीटवर झोपला होता. पहाटे सोबत असणारा व्यक्ती नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेला असता तितक्यात तेलोरे यांनी एकांत पाहून गाडीतच स्वत:ला संपवुन घेतले.

चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रवाशांना उभे राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला जो बार लावलेला असतो, त्याला सुती दोरीच्या सहायाने तेलोरे यांनी गळफास लावून घेतल्याचे आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Ahmednagarlive24 Office