विधानसभेसाठी प्रशासन सज्ज ! कशी आहे यंत्रणा, मतदान यंत्रे? विखेंनी आक्षेप घेतलेली यंत्रे आताही वापरणार का? पहा सविस्तर..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : राज्यात विधानसभेचा बिगुल लवकर वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

जिल्हा निवडणूक विभागाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी सुरू केली आहे. येत्या ४० दिवसांत ही तपासणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम पुढील दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसोबत निवडणूक यंत्रणा व प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे.

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकवरून ४ हजार ४३५ मतदान यंत्रे येणार आहेत. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघासाठी येत्या १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या,

तसेच अतिरिक्त ठरवून दिलेल्या राखीव कोट्यानुसार मतदार यंत्रे तपासून निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी येत्या २७ ऑगस्टला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

साडेचार हजार यंत्रांची मागणी
जिल्ह्यात प्रत्यक्षात आवश्यक असणारी आणि रास्खीव अशा १२७ टक्के बीयू, १२७ टक्के सीयू आणि १३७ टक्के व्हीव्ही पॅट मशीनचा कोटा पूर्ण करण्यात येणार आहे. २ हजार ७९३ बीयू, १ हजार २८४ सीयू आणि १ हजार ३५८ व्हीव्ही पट अशी यंत्रे

जवळपास ४ हजार ४३५ यंत्रे ही नाशिकवरून उपलब्ध होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. पुढील ४० दिवस म्हणजेच १० सप्टेंबरपर्यंत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रणांची तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे.

विखे-लंके अन ‘तो’ वाद..
डॉ. सुजय विखे-पाटील यांनी लोकसभा निवडणूक निकालाविरोधात न्यायालयात अपील केले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत लोकसभा निवडणुकीत वापरलेली यंत्रे वखार महामंडळाच्या गोदामात राहणार आहेत.

न्यायालयाच्या निर्देशानुसारच जिल्हा निवडणूक विभाग पुढील कार्यवाहींच करणार आहे. तो अंदाज घेऊनच इतर यंत्रांची मागणी केली असल्याची माहिती आहे.

Ahmednagarlive24 Office