Ahmednagar Politics : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे गाव पंचायत, नागरिक, गजराज, घोडे, टाळकरी यांच्या समवेत बुधवारी (दि. ३१) सकाळी होणाऱ्या यात्रेस प्रशासनाने भाजप नेत्याच्या सांगण्यावरून परवानगी नाकारली आहे.
आमच्या यात्रेचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्यापूर्वी होणार आहे. त्यामुळे या आध्यात्मिक यात्रेला प्रशासनाने निकषांसह परवानगी द्यावी. प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी आम्ही शांततेच्या मार्गाने यात्रा काढणार आहोत, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यात्रा नियोजनासाठी पवार यांनी गुरुवारी चोंडी येथे बैठक घेतली. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र गुंड, राजेंद्र कोठारी, बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथा, सतीश शिंदे, सुरेश भोसले, अक्षय शिंदे, सुधीर राळेभात, बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, प्रकाश सदाफुले,
चोंडीचे सरपंच सुनील उबाळे, नगरसेवक दिगंबर चव्हाण आदी उपस्थित होते. रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात चोंडीसाठी बारा कोटींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर केला होता.
मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. आमदार राम शिंदे यांनी यांनी विकासकामाच्या निधीला स्थगिती आणली. न्यायालयात जाऊन ती स्थगिती उठविली. तसेच घाटाचे काम २० टक्के झाले असताना ते बंद पाडून दुसऱ्या बाजूला नेण्यात आले. तो निधी त्यांनी तिकडे वळविला. चांगल्या चाललेल्या कामात विघ्न आणण्याचे काम ते करत आहेत, अशी टीका शिंदे यांच्यावर केली.
कुकडीच्या आवर्तनावरून विखेंना टोला
पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार हे कुकडीच्या आवर्तनाला विरोध करत असताना नगरच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी तर राजीनामा दिला पाहिजे, असे खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले होते. सोबतच राष्ट्रवादीचे आमदार गप्प का? असा सवाल त्यांनी केला होता.
त्यावर रोहित पवार म्हणाले, आमच्यावर आरोप करणाच्या भाजप नेत्यांनी कुकडीच्या आवर्तनाबाबतच्या बैठकीला तरी उपस्थित राहायला हवे. आम्ही तर आवर्तन सोडण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत होतो. जे बैठकीला नव्हते ते आमच्यावर टीका करत आहेत.
त्यांना हे लक्षात नाही की, आता सरकार बदलले आहे.कुकडीच्या आवर्तनावरून विखेंना टोला पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार हे कुकडीच्या आवर्तनाला विरोध करत असताना नगरच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी तर राजीनामा दिला पाहिजे, असे खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले होते. सोबतच राष्ट्रवादीचे आमदार गप्प का? असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर रोहित पवार म्हणाले, आमच्यावर आरोप करणाच्या भाजप नेत्यांनी कुकडीच्या आवर्तनाबाबतच्या बैठकीला तरी उपस्थित राहायला हवे.
आम्ही तर आवर्तन सोडण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत होतो. जे बैठकीला नव्हते ते आमच्यावर टीका करत आहेत. त्यांना हे लक्षात नाही की, आता सरकार बदलले आहे.