file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- चार दिवसांच्या विश्रांतीनंतर नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे.

नगर शहरात तासभर झालेल्या दमदार पावसाने रस्ते जलमय झाले आहे. हवामान खात्याने ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने कल्याण रोडवरील पुल काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

चार पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रविवारी दुपारनंतर नगर शहरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. राहुरी, नगर, शेवगाव, पाथर्डीच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने

नांदूरमधमेश्‍वर बंधाऱ्यातून ४०४ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. भिमा नदीवरील दौंड पूलापासून सुमारे २ हजार ४७० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे.