इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेकडे सदर अत्याचारित अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी आलेली होती.
त्या मुलीबरोबर परिसरात राहणाऱ्या आरोपी तरुणाची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ते दोघेही नाशिकला पळून गेले. यानंतर ते जुन्नर तालुक्यात नातेवाईकांकडे राहत होते. आरोपी तरुणाने त्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. मुलगी घरातून गायब झाल्याने तिच्या नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली.
त्यानंतर तालुका पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील भोसलेवाडी येथे जावुन आरोपी तरुणासह त्या अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. पोलिसांनी संकेत येवले याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.