अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना पारनेर मध्ये घडली आहे.
महिलेच्या पोटाला दगड बांधून तीला तलावात टाकून देण्यात आले होते. नंदा पोपट जाधव असे मयत महिलेचे नाव असून आरोपी पोपट जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चार वर्षापूर्वी मयत नंदा जाधव यांचा पोपट जाधव याच्याशी विवाह झाला होता.
विवाहानंतर अपत्य होत नसल्याने आरोपी पोपट जाधव पत्नी नंदा हिला नेहमी त्रास देत असे. गेल्या पाच महिन्यांपासून नंदा जाधव गरोदर होती.
ती गरोदर असल्याचे समजल्यानंतर आरोपी पोपट जाधव तिच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा. याच कारणाने त्याने दि. 30 मार्च रोजी नंदा जाधव हिच्या पोटाला दगड बांधून तलावात टाकून दिले. त्यानंतर रविवारी ही घटना उघडकीस आली.
आरोपी पोपट जाधव घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली असून त्याने हत्येची कबुली दिली आहे.
पारनेर तालुक्यातील वाघवाडी येथे हि संतापजनक घटना घडली असुन ह्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे