अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका नगरच्या पाणी योजनेला बसला आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
पाणी योजनेच्या मुळानगर पंपिंग स्टेशन परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला.
वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणी उपसा पूर्ववत होण्यास किमान तीन ते चार तासांचा अवधी लागणार आहे.
त्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार आहे. सोमवारी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास कोठला, झेंडीगेट, मंगलगेट, सर्जेपुरा,
कचेरी परिसर, रामचंद्र खुंट, माळीवाडा, दाळमंडई तसेच उपनगर भागास उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.