ताज्या बातम्या

अहमदनगरचा पाणी पुरवठा विस्कळीत, कोठे? किती दिवस?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची नवीन मुख्य जलवाहीनी देहरे गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावा फुटली. त्यामुळे पुढील काळात पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

जलवाहीनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतलेले आहे. परंतु जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने त्याला बराच अवधी लागणार आहे. त्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही.

शनिवारी रोटेशन नुसार शहर पाणी वाटपाच्या मध्यवर्ती भागास उदा . झेंडी गेट, सर्जेपुरा, मंगलगेट, कचेरी परिसर, हातमपुरा’ रामचंद्र खुंट’ कोठला’ माळीवाडा’ इ .भागाचा तसेच सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी, टि.व्ही. सेंटर हाडको, प्रेमदान हाडको, बिशप लॉईड कॉलणी ,

झोपडी कॅन्टीन परिसर इत्यादी भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार असुन तो रविवारी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल. रविवारी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा उदा . सिद्धार्थ नगर ‘

लालटाकी’ दिल्लीगेट’ चितळे रोड, तोफखाना, नालेगांव ‘ कापड बाजार , आनंदि बाजार, नवीपेठ, माणिक चौक इ. भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असून या भागास सोमवारी पाणी पुरवठा करण्यात येईल .

Ahmednagarlive24 Office