अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर पंपींग स्टेशन येथील ७२५ अश्वशक्तीचा पंप नादुरुस्त झालेला होता.
सदरचा पंप मंगळवार दि.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता दुरुस्त करुन दोन दिवसापासून विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा पुर्व पदावर आणण्याचे प्रयत्न सुरु असताना दि.१७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता पुन्हा मुळानगर पंपींग स्टेशन येथील ७२५ अश्वशक्तीचा पंप नादुरुस्त झालेला आहे.
सदरचा नादुरुस्त पंप दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतलेले आहे. परंतु पंप दुरुस्तीचे कामास अवधी लागणार आहे. मुळानगर पंपींग स्टेशन येथील पंप पुन्हा नादुरुस्त झाल्यामुळे अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्व उपनगर भागास दैनंदिन अपेक्षित असणारा पाणी उपसा पुर्ण क्षमतेने करण्यास अडथळा निर्माण झालेला आहे.
त्यामुळे दि.१६ फेब्रुवारी रोजीपासून रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्व उपनगर भागास उशिराने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे व पंप दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने पाणी उपसा पुर्ववत होईपर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे.
तरी नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने आवाहन केले आहे.