अहमदनगरची कन्या, प्रथम बॉलिवूड अभिनेत्री अर्शिन मेहता झळकली वेब सीरिज मध्ये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- अहमदनगरचे नाव बॉलिवूड क्षेत्रात घेऊन जाणारी अर्शिन मेहता ही बॉलिवूड मध्ये अभिनेत्री म्हणून आपले स्थान मिळवणारी एकमेव अहमदनगर शहरातील अभिनेत्री आहे.

द रॅली, सल्लु की शादी असे हिट बॉलिवूड चित्रपट तिने दिले आहेत. आपल्या उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर तिने आपली स्वतंत्र ओळखच या क्षेत्रात बनविलेली आहे. यामुळे तिला वेब सिरीज मध्ये संधी मिळाली आहे. या वेब सिरीज मध्ये तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.

अर्शिन मेहता हिने सलमान खान, वरून धवन, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर आशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे.

अहमदनगरची कन्या असलेली अर्शिन हि शहरातील एकमेव अभिनेत्री असल्याने वेब सिरीज करणारी अर्शिन ही पहिलीच अभिनेत्री ठरली आहे.

ह्यामुळे तिचे चाहते देखील प्रचंड प्रमाणात वाढले असून त्यांच्यामागे या वेब सीरिज बद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला अर्शीन ने “में हीरो बोल रहा हुं” ही वेब सिरीज मध्ये मनस्वी नावाची मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.

तिच्या अभिनयाने सर्वच चाहते आनंदी होताना दिसतात. मुख्य म्हणजे अर्शीन ही अभिनेत्री म्हणून नावाजलेली आहेच याबरोबरच ती एक प्रोफेशनल चार्टर्ड अकाऊंटंट आहे. संपूर्ण बॉलिवूड क्षेत्रामध्ये सी. ए असलेली अर्शीन एकमेव अभिनेत्री आहे.

त्यामुळे नगरकरांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. अर्शीन ने तिच्या कलेच्या जिवावर नगरचे नाव नक्कीच मोठे करण्याचा प्रयत्न केला आहे व करत आहे. तरुण वर्ग अर्शिनला एक रोल मॉडेल म्हणून पाहत आहेत. यामुळे आपसूकच तिच्याबद्दल नगरकरांच्या अपेक्षा देखील उंचावल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24