अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  कडक लाॅकडाऊन, महसूल, पोलीस प्रशासनाने त्याची केलेली अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग, तत्काळ केलेले उपचार, वाढलेले संस्थात्मक विलगीरण केंद्र यामुळे जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा जोर ओसरत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अवघे  530  रुग्ण वाढले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्ण संख्या ही शंभर च्या खाली आता आली आहे. 

गावोगावी विलगीकरण कक्ष उभारल्याने तेथेही रुग्णांची सोय झाल्याने गावातील रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. त्यामुळे कोरोना संसर्गाची आकडे सध्यातरी मोठ्या प्रमाणात घटले असून ही बाब दिलासा देणारी आहे. 

 

अहमदनगर लाईव्ह 24