अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Maharashtra News :- आता देशात हवाई प्रवास महाग झाला आहे. तिकीट दरवाढीची दोन कारणे दिली जात आहेत. पहिले कारण म्हणजे ATF 26 टक्क्यांनी महाग झाला आहे. दुसरे कारण म्हणजे 80 ते 90% सिटांची विक्री.
वाढीव दरामुळे दिल्ली मुंबई दरम्यान 2500 रुपयांना मिळणारे एअर इंडियाचे तिकीट आता 4000 रुपयांना मिळत आहे. इंडिगोने प्रवास करण्यासाठी हेच तिकीट 6000 रुपये आहे.
2022 च्या सुरुवातीपासून एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) दर 15 दिवसांनी वाढत आहे. आता पाचव्यांदा 3.30 टक्के वाढ केल्यानंतर, यावर्षी ATF 26% वाढले आहे.
कोरोनाचे संकट संपल्यानंतर आता प्रवासी विमान प्रवासात मोठा उत्साह दाखवत आहेत. अशा स्थितीत विमान कंपनी भाड्याची डायनॅमिक पद्धत वापरत आहे.
म्हणजेच, सिट वेगाने विकल्या जात आहेत. त्यामुळेच भाडेवाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या वाढत्या किमती हा भाडेवाढीचा एक छोटासा घटक आहे आणि सिट लवकर भरणे हा त्याहून मोठा घटक आहे.
आम्ही किंमत वाढवली आणि विमान रिकामे झाले, तर त्याचा काही उपयोग नाही, त्यामुळे प्रवाशांचा उत्साह लक्षात घेऊन किंमत ठरवली जाते. विमान प्रवासाची तिकिटे एक वर्ष अगोदर खरेदी करता येतात.
परंतु विमान प्रवासाच्या एक महिना आधी किमान 30% तिकिटे विकली जावीत अशी योजना एअरलाईन्स करतात. तसे न झाल्यास तिकिटांचे दर कमी केले जातात किंवा काही ऑफर देऊन तिकीटांची विक्री केली जाते.