एअरटेल धमाका ! आयपीएलचा प्रत्येक सामना 52 दिवसांपर्यंत फ्रीमध्ये पहा ; वाचा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 14 व्या सत्राचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. टूर्नामेंटची सुरुवात 9 एप्रिलपासून मुंबई इंडियन्स आणि बेंगळुरू यांच्या सामन्याने सुरु होईल. हा सामना चेन्नईत रंगणार आहे.

अंतिम सामना 30 मे 2021 रोजी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. दरम्यान, असे बरेच यूजर्स आहेत ज्यांना सामना लाइव टेलीकास्ट पाहण्याची इच्छा असते. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशाच एका सर्विसबद्दल माहिती देणार आहोत.

एअरटेलनेआयपीएल दरम्यान आपल्या यूजर्ससाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेंतर्गत, प्रत्येक यूजर कोठेही बसून आयपीएलच्या प्रत्येक सामन्याची लाइव एक्शन पाहू शकतो. एअरटेलच्या प्रीपेड प्लॅन यूजर्सना 401 रुपयांमध्ये हॉटस्टारची व्हीआयपी सब्सक्रिप्शन मिळत आहे. योजनेची किंमत 400 रुपये ते 2698 रुपयांपर्यंत आहे.

401 रुपयांचा प्लॅन –

जर आपण 401 रुपयांच्या प्लॅन बद्दल चर्चा केली तर येथे आपल्याला 28 दिवसांची वैधता मिळेल आणि आपल्याला दररोज 3 जीबी डेटा मिळेल. यामध्ये तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारची व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन देखील मिळेल.

448 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये आपल्याला दररोज 3 जीबी डेटा मिळेल, ज्याची व्हॅलिडिटी 28 दिवस असेल. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारची व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतील.

599 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये, यूजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल, जेथे प्लॅनची वैधता 56 दिवस असेल. सामन्यासाठी तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारची व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन मिळेल जो अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएससह येईल.

2698 रुपयांचा प्लॅन –

एअरटेलचा हा सर्वात महाग आणि शेवटचा प्लॅन आहे. यात आपल्याला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. परंतु त्याची वैधता 356 दिवस आहे. त्याच वेळी, आपल्‍याला सामन्यासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारची व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन मिळेल. त्याच वेळी, आपल्याला दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील मिळू शकतात.

आपण यापैकी कोणताही प्लॅन निवडल्यास आपण थेट हॉटस्टार वरून अ‍ॅप डाउनलोड करुन आपला फोन नंबर आणि त्यानंतर ओटीपी प्रविष्ट करुन सब्सक्रिप्शन एक्टिवेट करू शकता. एकदा एक्टिवेट झाल्यानंतर आपण आयपीएलचा प्रत्येक सामना लाइव कोठेही बसून पाहू शकता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24