ताज्या बातम्या

Best Recharge Plan : एअरटेल की जिओ? कोण देत आहे 2.5GB डेटासह Amazon Prime आणि Disney + Hotstar मोफत, जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Best Recharge Plan : सध्या ओटीटीवर चित्रपट पाहणे, शो पाहण्याचा खूप ट्रेंड आला आहे.अनेकजण डिस्ने हॉटस्टार आणि Amazon Prime च्या माध्यमातूनच मोबाईलवर सामने सुद्धा पाहतात. याच ओटीटीमुळे प्रवासातही सामने पाहणे आता सोपे झाले आहे.

अशातच आता तुम्हाला Amazon Prime आणि Disney + Hotstar मोफत वापरता येणार आहे. तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की अशी भन्नाट ऑफर कोण देत आहे? तर अशी ऑफर एअरटेल ही कंपनी देत आहे. तसेच कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 2.5GB डेटा वापरासाठी मिळत आहे.

भारतीय दूरसंचार कंपनीच्या मोठ्या नावांपैकी एअरटेल ही एक कंपनी आहे, हीच कंपनी Disney + Hotstar आणि Amazon Prime या दोन्हींचे 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. या प्लॅनची ​​किंमत 999 रुपये इतकी असून 84 दिवसांची वैधता आहे.

जाणून घ्या प्लॅनचे फायदे

कंपनीच्या 999  रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 2.5 जीबी डेटा मिळत आहे. कंपनीचा हा प्लॅन सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ देतो. तसेच यात दररोज 100 एसएमएसही मिळतात. इतकेच नाही तर अपोलो 24/7 सर्कल व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये FASTag रिचार्ज आणि विनामूल्य हॅलोट्यून्सवर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

जर OTT सबस्क्रिप्शनबद्दल बोलायचे झाले तर डिस्ने + हॉटस्टार मोबाईल प्लॅनचे सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहेत. त्याशिवाय Amazon Prime Video चे सदस्यत्वही 84 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. Xstream अॅपच्या सदस्यत्वाव्यतिरिक्त ही योजना RewardsMini सबस्क्रिप्शन देते. वापरकर्ते आता विंक म्युझिकसह आवडते गाणी ऐकू शकतात.

मिळत आहे 5G डेटा

जर तुमच्या भागात Airtel ची 5G सेवा आली असेल आणि तुमच्याकडे जर 5G सक्षम स्मार्टफोन असेल, तर तुम्हाला या प्लॅनसह रिचार्ज केल्यानंतर 5G स्पीडचा लाभ मिळत आहे. ही कंपनी देशातील सुमारे 150 शहरांमध्ये 5G सेवा देत असून तुम्ही Airtel Thanks अॅपवर जाऊन तुमच्या क्षेत्रासाठी 5G ची स्थिती तपासू शकता.

Ahmednagarlive24 Office