ताज्या बातम्या

Airtel Prepaid Plan : अप्रतिम प्लॅन! मोफत मिळवा अनलिमिटेड 5G डेटासह डिस्ने + हॉटस्टार, त्वरित करा रिचार्ज

Published by
Ahmednagarlive24 Office

Airtel Prepaid Plan : एअरटेलकडे अनेक प्रीपेड तसेच पोस्टपेड रिचार्ज प्लॅन आहेत. ज्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. कंपनीचे दोन प्रीपेड प्लॅन असून या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 3 महिन्यांसाठी डिस्ने + हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे.

कंपनीच्या एका एका रिचार्ज प्लॅनची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. इतकेच नाही तर कंपनी यात मोफत OTT सबस्क्रिप्शन शिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, हाय-स्पीड डेटा मिळत आहे.

839 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

कंपनीचा 839 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 84 दिवसांच्या पूर्ण वैधतेसह येत असून या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्ससह दिवसाला 2GB डेटा तसेच दररोज 100 SMS मिळत आहेत. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग कमी होऊन ६४ Kbps इतका होतो.

तसेच, वापरकर्ते एअरटेल थँक्स अॅपद्वारे रिचार्ज करतात तेव्हा त्यांना 2GB डेटा कूपन फ्री देण्यात येते. या प्लॅनमध्ये रिवॉर्ड्सचाही समावेश असून जसे की 5G नेटवर्क असणाऱ्या भागात अनलिमिटेड 5G डेटा. परंतु यासाठी वापरकर्त्याकडे 5G स्मार्टफोन असावा.

कंपनीच्या 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये, ग्राहकांना एकूण 3 महिन्यांसाठी 149 रुपयांचे डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत दिले जात आहे. याच्या मदतीने ग्राहकांना लाइव्ह स्पोर्ट्स, मूव्हीज, एक्सक्लुझिव्ह हॉटस्टार स्पेशल यांसारख्या भन्नाट कलेक्शनचा आनंद घेता येईल.

तसेच, कंपनीचा हा प्लॅन कोणत्याही एका निवडलेल्या Xstream चॅनेलवर 84 दिवस मोफत प्रवेश देत असून त्यात Sony LIV, Lionsgateplay, ErosNow, Hoichoi, ManoramaMax, Choupal आणि Kancha Lanka यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचा समावेश असणार आहे.

ग्राहक एअरटेल पेमेंट्स बँक रिवॉर्ड्स मिनी सबस्क्रिप्शन, अपोलो 24|7 सर्कल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी तसेच FASTag वर रु. 100 कॅशबॅक, मोफत हॅलोट्यून्स, मोफत विंक म्युझिक, लाइव्ह कॉन्सर्ट आणि पॉडकास्ट यांसारख्या अतिरिक्त फायद्यांचा लाभ घेऊ शकतात.

कंपनीचा 499 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या 499 रुपयांच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटा आणि 100 एसएमएससह अमर्यादित लोकल, STD आणि रोमिंग कॉल्सचा आनंद तुम्हाला घेता येईल. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग कमी होऊन ६४ Kbps इतका होतो. कंपनीच्या 839 रुपयांच्या प्लॅन प्रमाणेच, यात 5G नेटवर्क असणाऱ्या भागात अनलिमिटेड 5G डेटा सारख्या Airtel Rewards चा समावेश आहे.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney+ Hotstar Mobile चे 3 महिने पूर्णपणे मोफत सबस्क्रिप्शन मिळत असून जे लाइव्ह स्पोर्ट्स, चित्रपट, खास Hotstar स्पेशल आणि बरेच काही ऑफर करत आहे.

इतकेच नाही तर कंपनी ग्राहकांना Airtel Xstream अॅपद्वारे निवडलेल्या Xstream चॅनेलवर 28 दिवस मोफत प्रवेश देत आहे. या प्लॅनमध्ये रिवॉर्ड्स मिनी सबस्क्रिप्शन, 3 महिन्यांसाठी अपोलो 24|7 सर्कल मेंबरशिप तसेच FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, मोफत विंक म्युझिक,लाइव्ह कॉन्सर्ट, मोफत हॅलोट्यून्स, आणि पॉडकास्टचा मोफत प्रवेश मिळेल.

Ahmednagarlive24 Office