Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Airtel Recharge Plan : जिओला टक्कर देतो ‘हा’ एअरटेलचा प्लॅन! कमी किमतीत मिळवा अनलिमिटेड डेटासह अनेक फायदे

Airtel Recharge Plan : एअरटेल आपल्या ग्राहकांच्या गरजांनुसार वेगवेगळे भन्नाट रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. यात आता वर्षभर म्हणजेच 365 दिवसांपर्यंतचा प्लॅनचाही समावेश आहे. जर तुम्ही हा रिचार्ज केला तर तुम्हाला वर्षभर रिचार्ज करावा लागणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

म्हणजे तुमची सततच्या रिचार्जच्या कटकटीतून सुटका मिळू शकते. तुम्हाला यात FASTag रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन रिलायन्स जिओला टक्कर देतो. जाणून घेऊयात या रिचार्ज प्लॅनची किंमत.

जर तुम्ही या प्लॅनसह रिचार्ज केला तर, तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करावा लागणार नाही. एअरटेलच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनची किंमत 1,799 रुपये इतकी आहे.

जाणून घ्या किंमत आणि खासियत

कंपनीचा हा 1799 रुपयांचा प्लॅन अनेक फायद्यांसह येत असून यात ग्राहकांना एक वर्षाची म्हणजेच 365 दिवसांची वैधता देण्यात येत आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केला तर तुम्हाला वर्षभर रिचार्ज करावा लागत नाही. या प्लॅनमध्ये दीर्घ वैधतेसह 24GB डेटा मिळत असून डेटा मर्यादा संपल्यानंतर, ग्राहकांकडून 50p/MB शुल्क आकारण्यात येते. जर ग्राहकांना पाहिजे असेल तर त्यांना अतिरिक्त डेटासाठी डेटा व्हाउचर खरेदी करता येतो.

कंपनीच्या या वर्षभर चालणार्‍या प्लॅनमध्ये वर्षभर मोफत कॉलिंग शिवाय 3600 एसएमएस देण्यात येतात. तसेच एसएमएसची दैनिक मर्यादा 100 आहे. या प्लॅनमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येत आहेत.

मिळणार हे फायदे

ग्राहकांना या प्लॅनमध्ये, 3 महिन्यांसाठी Hellotunes, Wynk Music आणि Apollo 27|7 Circle चे मोफत सबस्क्रिप्शन तसेच FASTag रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे. या प्लॅनची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे. तर दुसरीकडे, जर आपण याच्या दैनंदिन खर्चाबद्दल बोलायचे झाले, तर ते 5 रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तुम्हाला 5 रुपयांच्या रोजच्या खर्चात कॉल, डेटा आणि एसएमएसचा लाभ घेता येईल.