ताज्या बातम्या

Airtel Recharge Plan : भारीच की! एअरटेलच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतो 3GB डेटासह OTT सब्सक्रिप्शन मोफत

Published by
Ahmednagarlive24 Office

Airtel Recharge Plan : एअरटेल ही एक आघाडीची टेलीकॉम कंपनी आहे. या कंपनीचे अनेक प्लॅन खूप लोकप्रिय आहेत. जर तुम्ही या कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण कंपनी आता काही प्लॅनमध्ये दररोज 3GB हाय- स्पीड डेटा देत आहे तर सर्व OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मोफत देत आहे. हे प्लॅन कोणते आहेत ते जाणून घ्या.

699 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनची किंमत 699 रुपये इतकी आहे. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा आणि 56 दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच, तुम्हाला दोन महिन्यांसाठी दररोज 3 GB हायस्पीड इंटरनेट मिळेल. तसेच अमर्यादित कॉलिंग सुविधा आणि दररोज 100 SMS मिळतील.

या प्लॅनमध्ये Amazon Prime Mobile आणि Airtel Xstream Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन मिळत असून त्यांची वैधता देखील 56 दिवसांसाठी आहे. Airtel Xstream सह SonyLiv देखील जोडता येईल.

हे ओटीटी प्लॅटफॉर्म तुम्हाला एअरटेल अॅपच्या मदतीने पाहता येईल. तसेच तुम्हाला विंक म्युझिक अॅपवर मोफत गाणी ऐकण्याची आणि मोफत हॅलो ट्यून्सची सुविधा मिळत असून Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

हा प्लॅन 999 रुपयांचा असून प्लॅनमध्ये तीन महिन्यांची वैधता आहे. यामध्ये ग्राहकाला 2.5 GB प्रतिदिन डेटा,अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये सर्व OTT फायदे उपलब्ध आहेत, मात्र त्यांची वैधता 84 दिवसांची आहे.

599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा हा 599 रुपयांचा प्लॅन असून याची 28 दिवसांच्या वैधता आहे. यामध्ये दररोज 3 GB डेटा मिळतो. तसेच अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. विंक म्युझिक अॅपवर विनामूल्य गाणी आणि विनामूल्य हॅलो ट्यून्सचा लाभ मिळतो. तसेच Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office