BSNL Recharge Plan under 400 : BSNL च्या ‘या’ प्लॅनसमोर Airtel-Vi फेल ! 400 रुपयांपेक्षा कमी पैशात मिळेल 5 महिन्यांसाठी सर्व काही मोफत


सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या स्वस्तात उपलब्ध करून देणाऱ्या रिचार्ज प्लॅनमुळे सतत Airtel आणि Vi ला टक्कर देत असते. अशातच आता कंपनीने आणखी एक स्वस्त प्लॅन आणला आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL Recharge Plan under 400 : भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्या Airtel, Vodafone Idea आणि Jio एकापेक्षा एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन घेवून येत असतात. सरकारची मालकी असणारी नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी BSNL सुद्धा खासगी कंपन्यांच्या तुलनेत जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणत असते.

या कंपनीचे प्लॅन्स हे खासगी कंपन्यांपेक्षा खूप स्वस्त किंमतीत जास्त फायदे देत असतात. असाच एक रिचार्ज प्लॅन BSNL ने आणला आहे. आता BSNL च्या या प्लॅनसमोर Airtel-Vi फेल झाले आहेत. जाणून घ्या BSNL च्या या रिचार्ज प्लॅनबद्दल.

BSNL चा 400 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

खरं तर, BSNL कडून 397 रुपयांचा प्लॅन ऑफर करण्यात येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 150 दिवसांच्या म्हणजेच 6 महिन्यांच्या वैधतेसाठी सुविधांचा लाभ मिळतो. ही कंपनीच्या प्रसिद्ध प्लॅनपैकी एक आहे.

या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. यासाठी दर ६० दिवसांनी ग्राहकाला व्हाउचर रिफिल करावे लागणार आहे. यात अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे.

बीएसएनएलचा 399 रुपयांचा प्लॅन

BSNL कडून 399 रुपयांचा प्लॅन ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता उपलब्ध असून याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 1 GB डेटा आणि दररोज 100 SMS दिले जात आहेत.

या प्लॅनमध्ये ग्राहकाला 80 दिवसांनी व्हाउचर रिफिल करावे लागणार आहेत. हा एक दीर्घ वैधता असणारा एक परवडणारा प्लॅन आहे ज्यामध्ये वापरकर्त्यांना 180 दिवसांसाठी अनेक सुविधांचा लाभ मिळतो. जेव्हा डेटा संपतो, तेव्हा इंटरनेटचा वेग 40 Kbps पर्यंत कमी होतो.