ताज्या बातम्या

Airtel World Pass Plans: ग्राहकांना दिलासा ! आता मिळणार 184 देशांमध्ये कॉलिंगसह फ्री डेटा ; किंमत आहे फक्त ..

Published by
Ahmednagarlive24 Office

Airtel World Pass Plans: देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने एक जबरदस्त प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमुळे परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने मोठी घोषणा करत परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी वर्ल्ड पास रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. 

आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या प्लॅनची सुरुवातीची किंमत फक्त 649 रुपये ठेवली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या प्लॅन अंतर्गत कंपनी यूजर्सना 184 देशांमध्ये मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा देणार आहे.

यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांकडे वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आणि पॅक होते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना जगातील कोणत्याही देशात 24X7 कॉल सेंटर सपोर्ट देखील मिळेल. चला तर जाणून घ्या या प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती.

एअरटेल वर्ल्ड पास पोस्टपेड प्लॅन

एअरटेलच्या नवीन वर्ल्ड पास रिचार्जची सुरुवातीची किंमत 649 रुपये आहे. 649 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त एक दिवसाची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनसह, लोकल आणि भारतात कॉलिंगसाठी 100 मिनिटे आणि 500 ​​एमबी हाय स्पीड डेटा उपलब्ध आहे.

2,999 रुपयांचा प्लॅन 

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 10 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 5 GB डेटा आणि कॉलिंगसाठी दररोज 100 मिनिटे आहेत.

3,999 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनमध्ये एका महिन्याची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि 12 GB डेटा प्रतिदिन मिळतो.

5,999 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये 900 मिनिटे (15 तास) व्हॉइस कॉलिंग आणि 2 GB डेटा 90 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे.

14,999 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनसह तुम्हाला एक वर्षाची वैधता मिळते. प्लॅनमध्ये 3000 मिनिटे व्हॉईस कॉलिंग आणि 15 जीबी डेटा उपलब्ध आहे.

एअरटेल वर्ल्ड पास प्री-पेड योजना

एअरटेलने वर्ल्ड पास प्री-पेड प्लॅनच्या रूपात चार प्लॅन लॉन्च केले आहेत. या प्लॅनमधील सर्वात स्वस्त प्लॅन रु.649 आहे. या प्लॅनमध्ये एक दिवसाच्या वैधतेसह 500 एमबी डेटा आणि 100 मिनिटे कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे.

899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10 दिवसांची वैधता, 100 मिनिटे कॉलिंग आणि 5 GB डेटा मिळतो. एअरटेलचा रु 2,998 वर्ल्ड पास प्री-पेड प्लॅन 200 मिनिटे कॉलिंग आणि 30 दिवसांच्या वैधतेसह 5GB डेटा ऑफर करतो. त्याच वेळी, 2,997 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक वर्षाची वैधता आणि 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लानमध्ये 2 GB डेटा देण्यात आला आहे.

हे पण वाचा :- Smart TV Discount : यापेक्षा स्वस्त काहीही नाही! 20 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही; जाणून घ्या कसा होणार फायदा

Ahmednagarlive24 Office