Ajab Gajab News : काय सांगता ! या श्रापित गावात मुली मोठ्या होताच बनतात मुले, शास्त्रज्ञही शोधू शकले नाहीत कारण

Ajab Gajab News : मुलगा (Boy) आणि मुलगी (Girl) ही निसर्गाची देणगी आहे. त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. पण आजकालच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे तेही शक्य झाले आहे. मुलाला लिंग (Gender) बदलून मुलगी करता येते तर मुलीला ही मुलगा बनवता येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आहे.

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी शस्त्रक्रियेद्वारे आपले लिंग बदलले आहे. पण जर तुम्हाला सांगितले की जगाच्या नकाशावर असे एक गाव (La Salinas Village) आहे, जिथे एका विशिष्ट वयानंतर मुली मुले होतात, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, हे नक्कीच आश्चर्यकारक आहे परंतु हे पूर्णपणे सत्य आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मोठे झाल्यानंतर या गावातील मुलींचे लिंग आपोआप बदलते. यानंतर येथील मुली मुले होतात. डोमिनिकन रिपब्लिकमध्ये ला सॅलिनास व्हिलेज नावाचे एक गाव आहे.

इथल्या मुलींमध्ये ठराविक वयानंतर लिंग बदल होतो. यानंतर येथील मुली मुले होतात. त्यामुळे येथील लोक या गावाला शापित गाव मानतात. हे रहस्य आजतागायत शास्त्रज्ञही शोधू शकलेले नाहीत.

मुलींना मुलगा होण्याच्या विचित्र आजारामुळे ला सॅलिनास गावातील लोक खूप अस्वस्थ आहेत. या गावात कोणतीतरी अदृश्य शक्ती आहे असाही अनेकांचा समज आहे. त्याचवेळी काही वडीलधारी मंडळी या गावाला शापित मानतात. या गावात अशा मुलांना ‘गुडोचे’ म्हणतात.

समुद्रकिनारी असलेल्या या गावाची लोकसंख्या सहा हजारांच्या आसपास आहे. आपल्या अनोख्या आश्चर्यामुळे हे गाव जगभरातील संशोधकांसाठी संशोधनाचा विषय राहिले आहे.

तर दुसरीकडे हा आजार ‘जेनेटिक डिसऑर्डर’ (Genetic disorder) असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्थानिक भाषेत या आजाराने ग्रस्त मुलांना ‘स्यूडोहर्माफ्रोडाईट्स’ (Pseudohermaphrodites) म्हणतात. ज्या मुलींना हा आजार असतो, त्या वयात आल्यावर त्यांच्या शरीरात पुरुषांसारखे अवयव तयार होऊ लागतात.

त्याचा आवाज जड होऊ लागतो आणि शरीरात असे बदल येऊ लागतात, ज्यामुळे तो हळूहळू मुलगीतून मुलगा बनतो. गावातील ९० पैकी एक मूल या अनाकलनीय आजाराशी झुंज देत आहे.