Ajab Gajab News : हा रेल्वेट्रॅक तुम्हाला खोटा वाटेल पण हे खरे आहे ! जाणून घ्या यामागील रंजक गोष्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajab Gajab News : जगात अशा काही गोष्टी घडत असतात त्यावर विश्वास ठेवणे तुम्हालाही कठीण जात असेल. तुम्हीही अनेकदा ट्रेनमधून (Train) प्रवास केला असेल. मात्र चित्रात दाखवल्या प्रमाणे रेल्वे ट्रॅक (Railway track) तुम्हीही कधीही पहिला नसेल. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही ते खोटे वाटेल असेल पण या ट्रॅकमागील कहाणी जाणूनच घ्या.. 

कधीतरी तुम्ही ट्रेनमधून प्रवास केला असेल किंवा रेल्वे लाईन जवळून पाहिली असेल. त्यांची एक खास गोष्ट म्हणजे ते नेहमी सरळ असतात आणि त्यांच्यातील अंतर रेल्वेच्या चाकांच्या अंतराएवढे असते.

जेव्हा जेव्हा ट्रॅकला वळवावे लागते किंवा मार्गानुसार फिरवावे लागते तेव्हा ते हळू फिरवले जाते जेणेकरून ट्रेन जर जास्त वेगाने वळली तर ती पलटी होणार नाही किंवा रुळावरून घसरणार नाही.

पण सापाप्रमाणे डावीकडे व उजवीकडे वळणारा ट्रॅक तुम्ही कधी पाहिला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रॅकचा फोटो दाखवणार आहोत, जो पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्ही तो खोटा समजाल.

भूकंपानंतर ट्रॅकची अशी अवस्था झाली होती

हा ट्रॅक पाहून तुम्हाला वाटेल की कोणीतरी फोटोशी छेडछाड करून त्याला सापासारखा वाकडा आकार दिला आहे किंवा ट्रॅक खोटा आहे आणि तो चित्रपटाच्या सेटसाठी बसवण्यात आला आहे. मात्र भूकंपामुळे (Earthquake) ट्रॅकची अशी अवस्था झाल्याचे सत्य आहे.

blogs.agu.org वेबसाइटच्या 2010 च्या रिपोर्टनुसार, हा फोटो Rolestone, New Zealand चा आहे. सप्टेंबर 2010 मध्ये, कँटरबरी, न्यूझीलंड (New Zealand) येथे 7.1 तीव्रतेच्या भूकंपाने हादरले होते, ज्यामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. या भूकंपामुळे रुळ उखडून त्यांचा आकार अशा प्रकारे वळवला गेला.

कामगार ट्रॅक सुधारताना दिसले

रिपोर्टनुसार, हा फोटो किवी रेलच्या माल्कम टेस्डेलने वेबसाइटला पाठवला होता. भूकंपानंतर रेल्वेचे अभियंते ट्रॅक सरळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोवर कमेंट करताना अनेकांनी सांगितले की, ट्रेनचे ट्रॅक कॉम्प्रेशनमुळे वाकले असावेत. यासारखे आणखी खरे बनावट फोटो पाहण्यासाठी संपर्कात रहा!