अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दिग्दर्शक एस. एस. राजामौली आता आपले ड्रीम प्रोजेक्ट आरआरआरवर काम करत आहेत.
या चित्रपटामध्ये बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण व अभिनेत्री आलिया भट्टदेखील आहेत. अजयने या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तो या चित्रपटामध्ये भगत सिंगच्या भूमिकेत दिसून येणार आहे. अजयने यापूर्वीही भगत सिंगची भूमिका साकारली आहे.
२००२ मध्ये आलेला राजकुमार संतोषीचा चित्रपट द लेजंड ऑफ भगत सिंगमधील शानदार अभिनयासाठी अजय देवगणला राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.