अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यांत विशेषत: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात कोरोना बाधितांची संख्या अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे.
दरम्यान त्यातच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्यात लागू असलेले निर्बंध आणखी कठोर होणार का? यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हायला हवे.
ज्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत अशा नागरिकांना आता घराबाहेर पडण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी द्यायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे. परवा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेल. प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत.
काही जणांचे असे मत आहे की, यापुढील 100 ते 120 दिवस महत्त्वाचे आहेत या काळात नियमांचे कठोर पालन व्हायला हवे. तसेचं ग्रामीण भागातील नगर जिल्ह्यातील एका गावात मी गेल्या आठवड्यात गेलो होते. तेथे कुणीही मास्क वापरत नव्हतं.
एक बाधित व्यक्ती इतरांना बाधित करु शकते. सर्वांनी फार बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. जी शिथिलता आली आहे ती घालवण्याची आणि अधिक कठोर करण्याची गरज आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.