अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- शासनात विलानीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर उतरले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला हा संप अद्यापही सुरु आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
कामगार न्यायालयाने चपराक लवल्यानंतर आता एस.टी.कर्मचाऱ्याचे विलिनीकरण होणारच नाही, ते डोक्यातून काढून टाकावे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केले.
शुक्रवारी सकाळी कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर आज सभागृहात बोलतांना अजित पवार म्हणाले, कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची आम्ही हमी घेतली आहे. परंतु एस.टी.कर्मचाऱ्याचे विलिनीकरण होणारच नाही.
नेमके काय म्हणाले अजित पवार? जाणून घेऊ
प्रत्येकाने हट्ट केला विलिनीकरण करा, आम्हाला सरकारमध्ये घ्या तर ते कुठल्याही सरकारला ते शक्य होणार नाही.
कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळाला पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजेत ते सरकार करत आहोत. एसटी संप मिटविण्यासाठी आम्ही चर्चा केली, सकारात्मक भूमिका घेतली होती.
मात्र तरीही संप सुरूच आहे. पगार १० तारखेपर्यंत देण्याची हमी दिली आहे. टोकाची भूमिका घेऊन गिरणी कामगारांची वाट लागली.
अजित पवारांच्या या परखड वक्तव्याने आता एसटी संप अजून चिघळणार का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान आता या वक्तव्यावर एसटी संपकरी काय भूमिका घेणार हा येणारा काळच ठरवणार आहे.