बिग ब्रेकिंग : अजित पवारांच्या अडचणी वाढल्या नातेवाइकांकडे १८४ कोटींची बेहिशेबी संपत्ती !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- आयकर विभागाने मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांवर तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही नातेवाईकांवर टाकलेल्या छाप्यांत सुमारे १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची माहिती बाहेर आली असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शुक्रवारी जाहीर केले.

मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणांवर ७ ऑक्टोबरला छापे टाकण्यात आले होते. यादरम्यान मिळालेल्या पुराव्यांनुसार बेहिशेबी संपत्ती तसेच व्यवहारांची माहिती बाहेर आली असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

कुणाचेही नाव न जाहीर करता सीबीडीटीने म्हटले आहे की, दोन्ही समूहांच्या १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाची माहिती देणारे दस्तऐवज या छाप्यात सापडले आहेत.

या छाप्यांत २.१३ कोटींची बेहिशेबी संपत्ती, ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या छाप्यांत काही कंपन्यांच्या बेहिशेबी आणि संशयास्पद व्यवहाराचीही माहिती बाहेर आली आहे.

बनावट शेअर प्रिमियम, कर्ज आणि इतर काही सेवांसाठी अवास्तव आगाऊ रक्कम देऊन करार करून ही बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचे निदर्शनास येत असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

प्राप्तिकर विभागाने सात ऑक्‍टोबर रोजी या कंपन्यांच्या मुंबईसह पुणे, बारामती, गोवा, जयपूर येथील तब्बल ७० ठिकाणांवर शोधमोहीम राबवली होती.

या शोधमोहिमेतून अनेक बेहिशेबी व्यवहार उघड झाल्याचे प्रसिद्धीपत्रक आज सीबीडीटीने जारी केले आहे. मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांच्या १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावेही या शोधमोहिमेत हाती लागल्याचे सांगण्यात आले आहे. बेहिशेबी व्यवहार करण्यासाठी या समूहांनी काही बनावट कंपन्यांचे जाळे तयार केले होते.

कंपन्यांनी संशयास्पद पद्धतीने मिळवलेल्या निधीतून अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. यात मुंबईत मोक्‍याच्या जागी एक कार्यालय, दिल्लीत एक फ्लॅट, गोव्यात रिसॉर्ट व महाराष्ट्रात काही शेतजमिनींची खरेदी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आल्याचे प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24