अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- अकोले बाजार समितीमध्ये 1774 गोणी कांद्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला 2100 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.
असा बाजारभाव मिळाला कांद्याला
अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहे. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवूण, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा.
कोरोना नियमांचे पालन आवश्यकच : बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करावे, असे आवाहन सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले.