Alert : चुकूनही ‘या’ दिवशी खरेदी करू नका सोने! नाहीतर आयुष्यभर बसावे लागेल रडत, जाणून घ्या यामागचं कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Alert : शुभ वेळी करण्यात आलेल्या कामाचे नेहमी चांगले फळ मिळते. ज्योतिषशास्त्रात कोणत्या दिवशी काय खरेदी करावे? आणि काय खरेदी करू नये हे सांगितलं आहे. तसेच कोणत्या दिवशी काय खरेदी केल्याने कोणते फायदे होतात हेदेखील सांगितले आहे.

अनेकजण सणासुदीला सोन्याची खरेदी करत असतात. जर तुम्हीही सोने खरेदी करणार असाल तर जरा थांबा. तुम्ही चुकीच्या वेळी तर सोन्याची खरेदी करत नाही ना? ते एकदा जरूर पहा. नाहीतर तुम्हाला त्याचा खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

धार्मिक शास्त्रांमध्येही सोन्याचे महत्त्व सांगितले आहे. जे कुबेर, संपत्तीचा देव आणि माता यांच्याशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रातही सोन्याला खूप महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने घेण्याच्या विचारात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. वास्तुशास्त्रानुसार एखाद्या शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तावर सोन्याची खरेदी करणे खूप फायदेशीर आहे.

वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की सोने फक्त शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तावर खरेदी करा. नाहीतर, याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे सोन्याची खरेदी फक्त विशिष्ट दिवशी, शुभ तिथी आणि शुभ मुहूर्तावर करा.

शनिवारी सोने खरेदी करणे टाळा

धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी सोने खरेदी करणे टाळा. कारण तुम्ही या दिवशी सोने खरेदी केले तर तर घराची आर्थिक स्थिती खराब राहते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये सोन्याचा संबंध सूर्यदेवाशी जोडला आहे आणि शनिवार हा शनिदेवाला समर्पित असून मान्यतेनुसार सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात वैराची भावना आहे. त्यामुळे शनिवारी सोने खरेदी चांगले नाही. असे म्हटले जाते की शनिवारी सोने खरेदी केले तर त्या व्यक्तीचे खूप मोठे नुकसान होते. शनिवारी सोने खरेदी केले तर सूर्यदेव कोपतात.

ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार आणि रविवारी सोने खरेदी करणे खूप फायद्याचे असते. तुम्ही या दिवशी सोने खरेदी केले तर तुमची जीवनात खूप प्रगती होते आणि आर्थिक स्थितीही सुधारते. इतकेच नाही तर या दिवशी सोने खरेदी केले तर कुबेर, माँ लक्ष्मी तसेच सूर्य प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त मिळतो.

धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे खूप फायद्याचे मानले जाते. मान्यतेनुसार या दिवशी सोने खरेदी केले तर लक्ष्मी तसेच भगवान कुबेर यांची आशीर्वाद प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती वाढ होते.