अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाच्या शिक्षिका संगीता गणेश देशमुख (रा. साईनगर) या सकाळी
आपली दुचाकी लावत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यानी सकाळी ९.२० वाजेच्या सुमारास ६० हजार रुपये किमतीचे सुमारे दीड तोळ्यांचे सोन्याचे गंठण पळवले.
त्यामुळे शहरातील महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले. साईनगर या उपनगरातील फिर्यादी महिला संगीता देशमुख या कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव शहरातील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात शिक्षिका आहेत.
त्या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून साईनगर येथील घरून निघाल्या व शाळेत पोहचल्या असताना त्यांनी आपली दुचाकी हि शाळेच्या आवारात लावण्यासाठी गाडी थांबवली असताना
त्यांच्या मागावर असलेल्या दोन चोरट्यानी संधी साधत त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किंमतीच्या दीड तोळा सोन्याच्या गंठणावर डल्ला मारून आपल्या काळ्या रंगाच्या शाईन दुचाकीवरून पोबारा केला.
त्यातील पाठीमागे बसलेल्या आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची पॅन्ट व डोक्यावर निळ्या रंगाची टोपी घातलेली होती. त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.