‘अन् ‘तिला’ पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वांची एकच धावाधाव..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असणाऱ्या रेल्वे अंडरग्राऊंड पुलाखाली साचलेल्या पावसाच्या पाण्यात कार अर्धवट अवस्थेत बुडून अडकून पडल्याची घटना आज घडली.

तिला बाहेर काढण्यासाठी सर्वानी एकच धावाधाव केली. श्रीरामपूर शहरातून गोंधवणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच गोंधवणी कडुन येणाऱ्या रस्त्यावर पूर्ण पाण्याचे तळे साचले होते.

रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात कार चालकाने आपली कर घातली. कार चलकाने त्यातून  वाट काढत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

परंतु चार ते पाच फूट पाणी साचलेले असल्यामुळे या मोटरकार चालकाची पाण्यात अर्धवट बुडून अडकून पडली.

त्यानंतर तेथे काही तरुण आले आणि त्यांच्या मदतीने ही मोटर कार गोंधवणी रोडच्या दिशेने वरती ढकलत बाहेर काढण्यात आली.

श्रीरामपूर शहरात सायंकाळी साडेचार वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे येण्या जाण्याचा रस्ता वाहतुकीस बंद होता.

अहमदनगर लाईव्ह 24