अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. याप्रकरणातून मारहाण, धमकावणे, आत्महत्या, खून अशा घटना घडू लागल्या आहेत.
नुकतेच असाच एक प्रकार कोपरगाव गावात घडला आहे. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नगदवाडी हद्दीतील एक ३८ वर्षीय महिलेशी बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी करून आरोपीने महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केले.
या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपी गंगाधर गजाराम जावळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत महिलेच्या पतीने फिर्यादीत म्हटले आहे की,आपली पत्नी हिचे सोबत आरोपी बाबासाहेब जावळे याने बळजबरीने प्रेमसंबंध ठेऊन आपल्या पत्नीस वेळोवेळी,
”तू कोणाला काही सांगशील काही तक्रार करशील तर तुझे व माझे लफडे आहे असे सर्व गावात सांगेल. आपल्या पत्नीला नेहमी धमकी देऊन आपल्या घरी येऊन पत्नीस वेळोवेळी मारहाण करून,तू,
माझे सोबत राहा,अशी दमदाटी करून आपल्यास व आपल्या पत्नीस जीवे मारण्याची धमकी देत असे” या आरोपीच्या त्रासाला कंटाळून मयत पत्नीस आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे
अशी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी गंगाधर गजाराम जावळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.