दुकाने उघडण्याची परवानगी द्या; अन्यथा भीक मागो आंदोलन करणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने विरोध दर्शवून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

तर सर्व दुकानांना नियमांचे पालन करून उघडे ठेवण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

राज्य सरकार सर्वसामान्यांना भिकेला लावत असल्याचा आरोप करुन, राज्य सरकारने सर्वसामान्यांचा विचार न केल्यास रस्त्यावर येऊन भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शहर संघटक आफताब भागवान, पवन भिंगारदिवे, जमीर इनामदार, शहर उपाध्यक्ष जावेद सय्यद, संतोष पाडळे आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने मंगळवार (दि.6 एप्रिल) पासून मिनी लॉकडाऊन करुन जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येणार आहे.

सर्वच बाजारपेठा, सलून व इतर व्यवसाय बंद केल्याने तेथे काम करणार्‍या लाखो कामगारांचा रोजगार बुडणार असून, या निर्णयामध्ये बदल करणे आवश्यक आहे. परत राज्य सरकारने लॉकडाउन केल्याने त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

लॉकडाऊन करण्यापूर्वी राज्य सरकारने सर्वसामान्यांचा विचार केलेला नसून, या लॉकडाऊनने सर्वसामान्यांना भीक मागण्याची वेळ नक्कीच येणार आहे.

राज्य सरकारने घेतलेले कठोर निर्णय शिथील करुन सर्वसामान्यांना व गोरगरीब जनतेचा विचार करुन सर्व दुकानदारांना नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24