Best selling Car : अल्टो-स्विफ्ट नाहीतर ‘या’ कारला ग्राहकांची पसंती, फक्त 6.5 लाखात खरेदी करता येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best selling Car : भारतीय कार बाजारात सध्या हॅचबॅक कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता प्रत्येक महिन्याला सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या टॉप 5 कारमधील जवळपास मॉडेल्स फक्त हॅचबॅक कार आहेत. भारतीय बाजारात सध्या मारुती सुझुकी अल्टो आणि स्विफ्ट या दोन हॅचबॅक कारला मोठी मागणी आहे.

परंतु, आता मागच्या महिन्यात अल्टो आणि स्विफ्ट या कारला विक्रीच्या बाबत मागे टाकले आहे. या कारची किंमत किंमत फक्त 6.5 लाख रुपये इतकी आहे. कंपनीची ही कार कोणती आहे? अशी ऑफर कुठे मिळत आहे? जाणून घ्या.

1. मारुती बलेनो

मारुती सुझुकी या कंपनीची बलेनो ही फेब्रुवारी 2023 मध्ये सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली आहे. मागच्या महिन्यात 18,592 युनिट्सची विक्री झाली आहे तर फेब्रुवारी 2022 मध्ये 12,570 युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजेच वार्षिक आधारावर तिच्या विक्रीत 47.91 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुती बलेनोची किंमत 6.56 लाख ते 9.83 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

2. मारुती स्विफ्ट

सर्वात जास्त विक्री होण्याच्या बाबतीत मारुती स्विफ्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे, कंपनीने फेब्रुवारी 2023 मध्ये 18,412 युनिट्सची विक्री केली आहे. तर फेब्रुवारी 2022 मध्ये 19,202 युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजेच, त्याच्या विक्रीत 4.11% (वार्षिक) घट नोंदवण्यात आली आहे.

3. मारुती अल्टो

मारुती सुझुकी अल्टो विक्रीबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे, तिने फेब्रुवारी 2023 मध्ये 18,114 युनिट्सची विक्री केली असून फेब्रुवारी 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 11,551 युनिट्सच्या तुलनेत 56.82 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मारुती अल्टोची किंमत ही रु.3.54 लाख पासून सुरू होते. हे अल्टो 800 आणि अल्टो के10 या दोन मॉडेलमध्ये येते.

टॉप 10 कारची विक्री

1. मारुती बलेनो – 18,592 युनिट्स
2. मारुती स्विफ्ट – 18,412 युनिट्स
3. मारुती अल्टो – 18,114 युनिट्स
4. मारुती वॅगनआर – 16,889 युनिट्स
5. मारुती डिझायर – 16,798 युनिट्स
6. मारुती ब्रेझा – 15,787 युनिट्स
7. टाटा नेक्सॉन – 13,914 युनिट्स
8. मारुती सुझुकी Eeco – 11,352 युनिट्स
9. टाटा पंच – 11,169 युनिट्स
10. ह्युंदाई क्रेटा – 10,421 युनिट्स