Poco F1 Discount Offer : भन्नाट ऑफर ! अवघ्या 799 रुपयांमध्ये मिळत आहे ‘हा’ शक्तिशाली स्मार्टफोन

कमी बजेटमध्ये स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी आहे. कारण आता 800 रुपयांपेक्षाही कमी किमतीत Poco F1 हा स्मार्टफोन खरेदी करता येत आहे.

Poco F1 Discount Offer : भारतीय टेक बाजारात सतत नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच होत असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्याही त्यावर ऑफर देत असतात. परंतु, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमुळे कंपन्या सर्वच स्मार्टफोनच्या किमती जास्त ठेवत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच जर तुम्ही येणाऱ्या काही दिवसात स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुम्ही आता खूप कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकाल. Poco चा शक्तिशाली स्मार्टफोन फक्त 799 रुपयात उपलब्ध आहे. यात तुम्हाला 6GB रॅमसह 20MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

जाणून घ्या किंमत आणि ऑफर

Advertisement

जर या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन Amazon वर 48% डिस्काउंटनंतर 11,499 मध्ये लिस्ट करण्यात आला आहे, तर त्याची किंमत 21,999 रुपये आहे. म्हणजेच हा फोन 10,500 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध होईल.

तर दुसरीकडे, ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला एचएसबीसी कॅशबॅक कार्ड क्रेडिट कार्ड व्यवहारांवर एचएसबीसी कॅशबॅक कार्ड क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 5% (रु. 250 पर्यंत) झटपट सवलत मिळू शकते. तसेच इतर बँकेच्या कार्डांवरही सवलत उपलब्ध आहे.

मिळणार 10 हजार रुपयांची प्रचंड सूट

Advertisement

इतकेच नाही तर, एक्सचेंज ऑफर अंतर्गत, Amazon आता Poco F1 वर 10,700 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देत आहे. एक्सचेंज बोनसचा पूर्ण फायदा घेतल्यानंतर तुम्ही हा फोन (11,499-10,700) फक्त 799 रुपयांमध्ये मिळवू शकता.तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागणार आहे की एक्सचेंज ऑफर अंतर्गत मिळणारे फायदे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असतील.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज सह येत आहे. नंतर याचे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येते. कंपनीच्या या फोनमध्ये 403 PPI, IPS LCD 6.18 इंच (15.7 सेमी) येत आहे. हा डिस्प्ले 1080 x 2246 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 18.7:9 आस्पेक्ट रेशोसह येतो. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आणि Android v8.1 (Oreo) ऑपरेटिंग सिस्टमने सुसज्ज असणार आहे.

Advertisement

कॅमेरा आणि बॅटरी पहा

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये 12-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 5-मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कंपनी या फोनसाठी 1 वर्षाची निर्मात्याची वॉरंटी देत असून खरेदीच्या तारखेपासून बॅटरीसह इन-बॉक्स अॅक्सेसरीजसाठी 6 महिने देत आहे.

Advertisement