Amazon Pay Balance : ॲमेझॉन देत आहे 50 हजार जिंकण्याची सुवर्णसंधी,कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amazon Pay Balance : ॲमेझॉन ही ई कॉमर्स साईट आहे. सध्या काळात अनेकजण याचा वापर करत आहे. या साइटवर स्मार्टफोनपासून घरातील वस्तूंपर्यंत सर्व साहित्य मिळते. ॲमेझॉन आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन ऑफर आणत असते.

वापरकर्त्यांनाही त्याचा खूप फायदा होतो. अशीच ऑफर ॲमेझॉनने आपल्या वापरकर्त्यांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये वापरकर्त्यांना तब्बल 50 हजारांपर्यंत रक्कम जिंकता येत आहे.

ॲमेझॉन क्विझ

जर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर तुम्ही आकर्षक बक्षिसे जिंकू शकतात. आज सहभागी असणाऱ्यांना ॲमेझॉनवर 500 रुपयांची Amazon Pay बॅलन्स जिंकू शकतात. या क्विझद्वारे तुम्ही 1,000 ते 50,000 रुपयांपर्यंत पैसे जिंकू शकता. हे लक्षात घ्या की ही क्विझ दुपारी 12:00 ते 11:59 पर्यंत उपलब्ध असणार आहे.

ॲमेझॉन रोज सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर पाच प्रश्नांची क्विझ प्रकाशित करत आहे. पैसे जिंकण्यासाठी तुम्हाला सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देणे खूप गरजेचे आहे . महिन्याच्या शेवटी विजेत्याची घोषणा केली जाणार आहे.

त्यासोबत हे लक्षात ठेवा की तुम्ही एका चुकीच्या उत्तरामुळे क्विझमधून बाहेर पडू शकता. फक्त ॲप वापर करणाऱ्यांना या क्विझमध्ये प्रवेश करता येत आहे.

अशी खेळा ॲमेझॉन क्विझ

  • क्विझसाठी तुम्हाला Google Play Store किंवा App Store वरून Amazon ॲप डाउनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर ॲपवर लॉग इन करा, किंवा जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर साइन अप करा.
  • साइन अप पर्याय निवडून विचारलेली योग्य ती माहिती भरा.
  • क्विझ बॅनर शोधण्यासाठी होम स्क्रीनवरून खाली स्क्रोल करावे लागेल.
  • तर क्विझ चालू करण्यासाठी, ॲमेझॉन क्विझ बॅनर आणि स्टार्ट बटणावर टॅप करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला पाच प्रश्न विचारले जातील. हे लक्षात ठेवा की तुम्हाला एका चुकीच्या उत्तरामुळे क्विझमधून बाहेर काढले जाईल. तसेच जर तुम्ही सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे दिली तर तुम्ही लकी ड्रॉसाठी पात्र व्हाल. आज दुपारी विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.