Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Amazon Offer : शेवटची संधी! होणार 18 हजारांपर्यंत फायदा, आजच खरेदी करा ‘हे’ शक्तिशाली स्मार्टफोन

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुमची आता स्मार्टफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत होऊ शकते.

Amazon Offer : जर तुम्ही मोठ्या सवलतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण Amazon चा Blockbuster Value Days सेलमध्ये खुप मोठ्या सवलती तसेच शानदार डिस्काउंट दिले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. कारण या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमध्ये OnePlus Nord CE 2 Lite आणि Samsung Galaxy M33 5G खरेदी करू शकता. या स्मार्टफोन खरेदीवर आता तुमची 18 हजारांपर्यंतची बचत होऊ शकते.

OnePlus Nord CE 2 Lite ऑफर

6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या OnePlus Nord CE 2 Lite या फोनची मूळ किंमत 19,999 रुपये इतकी आहे. मात्र तुम्ही हा फोन तुम्ही सेलमध्ये 18,990 रुपयांना विकत घेऊ शकता. जर तुम्ही SBI कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 1,000 रुपयांपर्यंतची आणखी सूट मिळू शकते.

हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता कंपनी 6 महिन्यांसाठी Spotify Premium चे मोफत सब्सक्रिप्शन उपलब्ध करून देत आहे. तर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला हा फोन 18,000 रुपयांपर्यंत आणखी स्वस्तात मिळेल. परंतु त्या आधी हे लक्षात घ्या की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत ही तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि त्याच्या ब्रँडवर अवलंबून असणार आहे.

कंपनी या फोनमध्ये तुम्हाला 1080×2412 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.59-इंचाचा डिस्प्ले देत असून जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ६ जीबी रॅम असणारा हा फोन स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर काम करतो. यात फोटोग्राफीसाठी 64-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येत आहे. तर सेल्फीसाठी, कंपनीकडून या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येत आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येत असून जो 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत आहे.

Samsung Galaxy M33 5G ऑफर

सॅमसंगचा हा फोन ब्लॉकबस्टर डेज सेलच्या शेवटच्या दिवशी 32% डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. स्टोरेजचा विचार केला तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची मूळ किंमत 24,999 रुपये आहे. मात्र या सेलच्या शेवटच्या दिवशी तुम्ही तो 16,999 रुपयांना सहज खरेदी करू शकता.

कंपनीकडून या फोनवर 1,000 रुपयांचे कूपन डिस्काउंटही देण्यात येत ​​आहे. तर बँक ऑफर्समध्ये फोनची किंमत आणखी 1,000 रुपयांनी कमी केली जाईल. इतकेच नाही तर जे वापरकर्ते हा फोन खरेदी करतात त्यांना Spotify Premium चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत आणखी 15,600 रुपयांनी कमी केली जाईल.

या फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाल्यास हा फोन 6.6-इंचाच्या फुल HD+ डिस्प्ले सह येत आहे. तर याच्या डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिला ग्लास 5 दिली जात आहे. तर फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप दिला जात आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची बॅटरी मिळू शकते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 12 वर आधारित OneUI 4 वर काम करेल.