ताज्या बातम्या

Amazon Offer : अॅमेझॉन सेलमध्ये ‘हा’ स्मार्टफोन मिळतोय 5,699 रुपयांना, काय आहे ऑफर? जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Amazon Offer : जर तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर अॅमेझॉनवर स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्वस्तात खरेदी करण्याची संधी दिली जात आहे.

सेलमध्ये खरेदीसाठी HDFC कार्डवरून पेमेंट केल्यास 10% ची झटपट सूट दिली जात आहे. या ऑफरचा शेवटचा दिवस 14 डिसेंबर आहे.

दरम्यान तुम्हाला Techno Pop 6 Pro 6,299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करून दिला जात आहे. पण सेलमधील सर्वोत्तम ऑफर अंतर्गत, फोन 5,669 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती…

या टेक्नो स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले आहे, आणि यामध्ये यूजर्सना 6.6-इंचाचा डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिझोल्यूशन 720×1612 पिक्सेल आहे. फोनमध्ये डेन्सिटी 270 PPI स्क्रीन देण्यात आली आहे आणि त्याचा टच सॅम्पलिंग रेट 120 Hz आहे. याशिवाय फोन डिस्प्लेवर वॉटरड्रॉप नॉचही देण्यात आला आहे.

कॅमेरा म्हणून या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 8-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह AI लेन्सचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी कंपनीने या फोनच्या फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. टेक्नोचा हा फोन पॉवर ब्लॅक आणि पीसफुल ब्लू कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो.

Tecno Pop 6 Pro मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. तसेच, या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळेल. कंपनीचा दावा आहे की फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 42 दिवस टिकू शकतो. हा फोन Android 12 Go Edition आधारित HiOS 8.6 सह येतो. Quad-core MediaTek Helio A22 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office