Amitabh Bachchan:बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. त्यांच्याबद्दलच्या या काही गोष्टी..
-अमिताभ यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ रोजी झाला.
-अमिताभ यांना इंजिनियर व्हायचे होते. तसेच एअरफोर्समध्ये जाण्याचे त्यांचे स्वप्न होते
-एक काळ असा होता जेव्हा त्यांचे सगळे चित्रपट फ्लॉप ठरत होते.
-ऑल इंडिया रेडिओने देखील त्यांना नकार दिला होता.
-‘जंजीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अमिताभ यांचे नशीब पलटले. त्यानंतर बिग बींनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
-बच्चन आजही वयाच्या ८०व्या वर्षी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.
-त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. काही चित्रपट फ्लॉप देखील ठरले. पण अभिनयाच्या जोरावर अमिताभ यांनी सर्वांची मने जिंकली.