अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- महसूल अधिकार्यांकडे विनवणी करूनही जमिनीचा वाद निकाली निघत नसल्याने संतापलेल्या मद्यधुंद तर प्रांताधिकारी कार्यालयाच्या गच्चीवर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी त्याला वेळीच पकडल्याने त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. ही घटना काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.सचिन माणिक गोर्डे (वय 24) रा. धांदरफळ, ता. संगमनेर असे या तरुणाचे नाव आहे.
काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तो मद्यप्राशन करून शहरातील नवीन नगर रस्त्यावरील (Navin Nagar Road) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील इमारतीच्या गच्चीवर चढला.
मध्याच्या धुंदीत अधिकार्यांना शिवीगाळ करत त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी (Police) त्याला वेळेस अडविल्याने तो उडी मारू शकला नाही.
एका पोलीस अधिकार्याने त्याला शहर पोलीस ठाण्यात नेले. त्याची बाजू समजून घेऊन रात्री त्याला त्याच्या घरी सोडून देण्यात आले. या युवकाचा शेतजमिनीचा वाद आहे.
याबाबत त्याने प्रांताधिकारी, तहसीलदार यांना वेळोवेळी पत्र दिले होते. मात्र याबाबत कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या या तरुणाने रात्री साडेआठ वाजता प्रांताधिकारी कार्यालयाच्या गच्चीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या युवकाने रात्री उशिरा प्रांताधिकारी कार्यालयावर जाऊन उडी घेण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणी नियुक्तीस असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला का अडविले नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.