कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी घरीच थांबण्याचे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी घरात साजरी केली.

तर नागरिकांना कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी घरीच थांबण्याचे आवाहन केले. नालेगाव येथील राहत्या घरात सकट यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सुनिल सकट म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात कोरोनाचाचे संक्रमण वाढत आहे.

नागरिकांनी कर्तव्याची जाणीव ठेऊन घराबाहेर न पडता घरी सुरक्षित राहण्याची गरज असल्याचे सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24