file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- लग्नात नाचण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचा राग धरुन एका तरुणाच्या पोटात चाकुने वार करुन खून केला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील खेर्डे येथे घडली आहे. राजेंद्र रामकिसन जेधे (वय ३० वर्षे) असे त्या मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी याच गावातील बबन जगन्नाथ शेळके व प्रविण बबन शेळके यांना अटक केली आहे.

राजेंद्र जेधे हा पेट्रोलपंपावर काम करणारा युवक होता. खेर्डे गावातील राजेंद्र जेधे व प्रशांत शेळके यांच्या दोन वर्षापासुन एका लग्नात नाचण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. हा वाद गावातच मिटविण्यात आला होता. मात्र त्यानंतरही जेधे व शेळके यांच्यात वाद सुरुच होते.

दोघांचीही वादावादी होत होती. शुक्रवारी रात्री खेर्डे येथे राजेंद्र रामकिसन जेधे यांच्या घरासमोर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास किशोर बाबासाहेब शेळके, बबन जगन्नाथ शेळके, प्रविण बबन शेळके व प्रशांत बबन शेळके असे चौघेजण आले. किशोर शेळके याने राजेंद्र जेधे यास घराच्या बाहेर बोलवाले.

राजेंद्र जेधे घराच्या ओट्यावर आला असता त्याला तेथेुन शेळकेंनी रस्त्यावर आणले. शिवीगाळ व मारहान करीत असताना प्रशांत बबन शेळके यांने धारदार चाकुन राजेंद्र जेधे याच्या पोटावर वार केला. घटना घडत असताना काहीजण धावले. त्यावेळी शेळके पळुन गेले.

राजेंद जेधे यास पाथर्डीच्या उपजिल्हा रु्गणालयात उपचारासाठी नेले तेथुन नगरला जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र नगरच्या डॉक्टरांनी जेधे यास मयत घोषीत केले. शेषराव जेधे यांच्या फिर्यादीवरुन चौघाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.पोलिसांनी बबन जगन्नाथ शेळके व प्रविण बबन शेळके यांना अटक केली आहे.