अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- गेल्या आठ दिवसापासून राहाता शहर व परिसरात जनावरांचा लंप्पी या आजाराने त्रस्त केले. जनावरांच्या अंगावर फोड येऊन ते फुटतात. जनावरे चारा खात नाही. अन्न पाण्यावाचून तडफडताना दिसत आहे.
जनावरांना झालेल्या या रोगामुळे पशुपालक मोठ्या चिंतेत पडले आहे. गेल्या दहा दिवसापासून राहाता शहरातील शेकडो जनावरांना या आजाराची लागन झाली असून याबाबत वैद्यकीय अधिकार्यांना माहीती देऊनही त्यांनी दखल घेतली नाही.
खाजगी डॉक्टरांकडून शेतकरी उपचार करून घेत आहे. या आजाराची लसच अद्याप आली नाही असे सांगीतले जाते. सरकारच्या तालुका पशुधन केंद्रात औषधे उपलब्ध नाही आहे.
या आजारावर खाजगी डॉक्टर उपचार करून अव्वाच्या सव्वा फी वसूल करत आहे. यावर सरकारी अधिकार्यांचे नियंत्रण नाही तसेच या आजारावर लसच शिल्लक नसल्याने मोठ्या प्रमाणावर जनावरे या आजाराची शिकार होत आहे.
दरम्यान रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पशु वैद्यकीय अधिकार्यांकडे शेतकर्यांनी मागणी केल्यानंतर त्यांनी ही लस मिळावी म्हणून वरिष्ठ पातळीवर मागणी केली.
मात्र ही लस यायला पुढचा महिनाभर वाट पाहवी लागणार आहे. अद्याप या आजाराची लागन झालेल्या जनावरांची पाहणीही पशुवैद्यकीय पथकाने केली नसल्याच्या शेतकर्यांच्या तक्रारी आहेत.