वृद्ध आईला मुलाने घरातुन हकल्याने मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  आपल्या वृद्ध आईचा सांभाळ न करता आईला घरातून हाकलून दिल्याप्रकरणी राहुरी खुर्द येथील मुलाविरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेष्ट नागरीक अणि पालक यांचे पालन पोषन आणि कल्याण अधिनियम 2007 चे कलम 24 प्रमाणे अनुसया सिताराम डोळस रा .राहुरी खुर्द यांच्या फिर्यादीवरून आरोपीचे मुलगा संदिप सिताराम डोळस याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेने राहुरी पोलिस ठाण्याचे संवेदनशील पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी जेष्ठ नागरीकांना आवाहन केले आहे

की,६० वर्षा पुढील स्री किंवा पुरूषाचा आपल्या स्वतःच्या मालमत्तेतुन आपले मुले,नातेवाई किंवा पाल्य आपली काळजी घेण्यास निष्काळजीपणा किंवा नकार देत असतील

तर आपण कायदेशीर उदरनिर्वाहाची मागणी करू शकता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करू शकता आरोपीला तीन महिन्यापर्यंत तुरूंगवास अथवा पाच हजार रूपये दंडाची तरतूद आहे.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसोबत असे काही प्रकार घडले तर त्यांनी समोर यावे.

अहमदनगर लाईव्ह 24