राज्यात पुन्हा धडकी भरवणारी कोरोनाबाधितांची भर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४२,२८,८३६ झाली आहे. आज ६३,८१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०२ एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण ६,९४,४८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.. दरम्यान मुंबईत दिवसभरात ५,८६७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आत्तापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६,२२,१४६ एवढी झाली आहे.

तर आज ७१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आत्तापर्यंत १२,७२६ मृत्यूची नोंद करण्यात आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24