अज्ञात व्यक्तीने फळबागेवर फवारले तणनाशक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी ते पाडळी रस्ता शिवारातील शेतात अज्ञात व्यक्तीने (दि.५) रोजी दुपारी दोनच्या सुमारास झाडांवर तणनाशक मारून पपई, सीताफळ तसेच इतर फळझाडांचे नुकसान केले आहे.

असाच प्रकार मागील महिन्यात देखील कांद्याच्या उरळी जवळील सीताफळ आणि पपई या झाडांवर तणनाशक किंवा तत्सम औषध मारून १३ झाडांचे नुकसान केले होते.

या प्रकाराबाबत वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक कुशीनाथ बर्डे, खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष बर्डे, बाबासाहेब घुले, विठ्ठल बावणे,अशोक बावणे,

राजू घुले तसेच इतर शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली असून, असे करणाऱ्या व्यक्तीचा शोध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.हजारो रुपये खर्च करुन वृक्ष लागवड केलेली आहे.

हा सगळा खर्च परवडणारा नाही. त्यातच असा प्रकार घडत असेल तर परीसरातील शेतकऱ्यांसाठी खूप घातक आहे. असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांने आपले मत व्यक्त केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24